Local News

December 6, 2022

Pune Metro News : पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणे मेट्रोने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे. भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमीटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली. शिवाजी नगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली. मार्च 2023 पर्यंत पुणे मेट्रो सुरु होण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे. पुणेकरांना भूमिगत मेट्रोची उत्सुकता होती. आज अखेर चाचणी पार पडली. येत्या काही दिवसांत पुणेकरांसाठी भूमिगत मार्गावरील मेट्रो उपलब्ध असेल.  कशी पार पडली पहिली चाचणी?पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमिटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली. पुण्यातील रेंज हिल डेपोपासून एलिव्हेटेड मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो धावली आणि त्यानंतर ही मेट्रो रॅम्पचा सहाय्याने भूमिगत ट्रॅकवर आणण्यात आली. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर या ट्रेनची चाचणी करण्यात आली आणि तिथून पुढील स्टेशन सिव्हिल कोर्ट या स्टेशनवर देखील मेट्रोची चाचणी पार पडली. पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम हे 85 टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती, मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे.  मेट्रोसाठी एक नवीन आणि यशस्वी पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रोला मागील वर्षी मार्च महिन्यात हिरवा झेंडा दाखवला. वनाज ते रामवाडी या मार्गावर, गरवारे महाविद्यालय ते वनाज हा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी सुद्धा संपूर्ण मार्गावर मेट्रो कधी धावणार हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. भूमिगत स्थानकावर आज झालेली चाचणी हे पुणे मेट्रोसाठी एक नवीन आणि यशस्वी पाऊल आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना भूमिगत मार्गावरील मेट्रोत प्रवास करता येणार आहे.  मेट्रोचं एकूण अंतर  33 किलोमीटर आणि 11,420 कोटी रुपये खर्चपुणे मेट्रोसाठी एकूण 11,420 कोटी रुपये खर्च येणार आहे.  मेट्रोचे एकूण अंतर हे 33 किलोमीटर आहे. यात 10 किलोमीटर अंतर हे भूमिगत तर 27 किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे हा पहिला टप्पा सध्या सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वनाज ते डेक्कन या मार्गावर मेट्रोचाचणी करण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी ठरली आहे. आता वनाज ते रामवाडी तसेच स्वारगेट ते पिंपरी हे मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. 

December 6, 2022

मुंबई: तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार की तितकाच कायम राहणार याचा निर्णय उद्या होणाऱ्या आरबीआयच्या (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून बुधवारपर्यंत चालणार आहे. बुधवारी म्हणजे उद्या सकाळी रेपो दरात (Repo Rate) वाढ होणार की तितकाच राहणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे आरबीआयच्या निर्णयाकडे उद्योग जगतासोबतच सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) मागील तीन बैठकांमध्ये प्रत्येक वेळी व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आताही त्यामध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील ऑक्टोबरमध्ये महागाई दर 6.77 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तरीही तो RBIच्या वर्षभरातील 2 ते 6 टक्के या निर्धारित दरापेक्षा तो जास्त आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर सरासरी 6.7 टक्के असेल आणि 2023-24 या आर्थिक वर्षात 5.2 टक्क्यांपर्यंत घसरेल अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महागाई दर अद्याप पूर्ण नियंत्रणात आला नसल्याने उद्या आरबीआय पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची जास्त शक्यता आहे असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे.  रिझर्व्ह बँकेने या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र असे असतानाही जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या वरती राहिली आहे. त्यामुळे आताही महागाई दर नियंत्रित ठेवण्यासाठी यावेळीही व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.  रेपो रेट म्हणजे काय? ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.  रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?  रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate)म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो.  ही बातमी वाचा : भारतीय डिजिटल रुपया लाँच, काय आहेत CBDC ची वैशिष्ट्ये? त्याची का गरज आहे?

December 6, 2022

Britain India : इंग्रजांनी जगभरातील अनेक देशांवर राज्य केलं. भातरतावर देखील जवळपास 150  वर्षे राज्य केलं. या 150 वर्षात इंग्रजांकडून भारतीयांवर अमानुष अत्याच्यार करण्यात आल्याचे लाखो उदाहणे आहेत. इंग्रजांच्या दुलमी राजवटीतून 1947 ला भारत स्वंतत्र झाला. परंतु, त्याआधी त्यांनी आपल्या हुकुमशाही राजवटीने भारतीयांना नाहक त्रास दिला. हिंसा, वर्णभेदासह भारतीयांचे आर्थिक शोषण केले. ब्रिटनच्या जाचक धोरणांमुळे आणि कायद्यांमुळे अवघ्या 40 वर्षांत दहा कोटींहून अधिक भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. यावरून ब्रिटिश राजवट किती भयंकर होती, याची कल्पना येते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील डायलन सुलिव्हन आणि जेसन हिकल या दोन  अभ्यासकांनी त्यांच्या संशोधनातून ब्रिटिश वसाहतवादाचा बुरखा फाडलाय. या संशोधनानुसार 1880 ते 1920 या काळात ब्रिटिशांनी तब्बल दहा कोटी भारतीयांची हत्या केली होती. त्याच काळात सोव्हिएत युनियन, चीन आणि उत्तर कोरियामध्ये दुष्काळामुळे जेवढे लोक मरण पावले, त्यापेक्षा जास्त लोक भारतात ब्रिटीशांच्या दडपशाहीमुळे मरण पावले होते. यावरून मृतांचा हा  आकडा किती मोठा आहे याचा अंदाज येतो.  "ब्रिटिश राजवटीत भारतातील गरिबी 1810 मध्ये 23 टक्क्यांवरून 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली होती. ब्रिटीशांच्या काळात भारतातील वेतनात मोठी घट झाली होती. 19व्या शतकात वेतन सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे परिस्थिती आणखीनच धोकादायक बनली होती, अशी माहिती आर्थिक इतिहासकार रॉबर्ट सी. ऍलन यांच्या संशोधनातून पुढे आली आहे.   रॉबर्ट सी. ऍलन यांनी यांनी केलल्या दाव्यानुसार, ब्रिटीश राजवटीत भारतातील लोकांना प्रचंड अत्याचार सहन करावे लागले. 1880 ते 1920 दरम्यान ब्रिटनची दडपशाहीचे धोरण अत्यंत क्रूर होती. हा काळ भारतासाठी विनाशकारी होता. 1880 च्या दशकात ब्रिटिशांनी भारतात मोठ्या प्रमाणावर जनगणना सुरू केली. त्यातून एक भयावह चित्र समोर येते. 1880 च्या दशकात भारतात प्रति 1000 लोकांमागे 37 मृत्यू होत होते. 1910 मध्ये हा आकडा 44 पर्यंत वाढला.  वर्ल्ड डेव्हलपमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील एका पेपरमध्ये 1880 ते 1920 या चार दशकांमध्ये ब्रिटिश दडपशाही धोरणांमुळे मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी जनगणना डेटा वापरण्यात आलाय.  भारतातील मृत्यूची आकडेवारी 1880 पासूनच उपलब्ध आहे.  इंग्रज राजवटीच्या आधी भारतीय लोकांचे जीवनमान पश्चिम युरोपच्या विकसनशील भागातील लोकांसारखे होते.  आकडेवारीच्या कमतरतेमुळे ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात मृत्यूचे प्रमाण किती होते याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. परंतु, 16 व्या आणि 17 व्या शतकात इंग्लंडमध्ये मृत्यू दर हजार लोकांमागे 27.18 मृत्यू होता. 16 व्या आणि 17 व्या शतकात भारतातील मृत्यूदर इंग्लंडप्रमाणेच होता असे गृहीत धरले तर 1881 ते 1920 या काळात भारतात  तब्बल 16 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.  निर्यातदार देशाला आयातदार बनवले एकेकाळी भारत हा जगातील सर्वात मोठा औद्योगिक उत्पादक देश होता. भारतातून उत्तम दर्जाचे कपडे जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यात केले जात होते. 1757 मध्ये बंगालचा ताबा घेतल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू त्याचा नाश करायला सुरुवात केली. त्यानंतर भारतात राजवट स्थापन केल्यानंतर ब्रिटनने भारताचे उत्पादन क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. इंग्रजांनी भारतीय शुल्क व्यावहारिकरित्या रद्द केले. त्यामुळे भारतातील देशांतर्गत बाजारपेठेत ब्रिटिशांचा माल मोठ्या प्रमाणात दाखल झाला. दुसरीकडे इंग्रजांनी भारतात जास्त कर आणि शुल्क लादून भारतीयांना त्यांच्याच देशात कापड विकण्यापासून रोखले. इंग्रजांनी भारतातील बड्या उत्पादकांना या भेदभावपूर्ण व्यापार व्यवस्थेने चिरडून टाकले आणि भारतातील उद्योगधंदे अतिशय प्रभावीपणे उद्ध्वस्त केले. आपल्या क्रूर नितीने एकेकाळी निर्यातदार असणाऱ्या भारत देशाला इंग्रजांनी आयातदार बनवले.  भारतीय अर्थव्यसस्थेच्या चिंधड्या भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाली तेव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 23 टक्के होता. परंतु, इंग्रांनी भारत सोडला त्यावेळी हा आकडा अवघ्या चार टक्क्यांवर आला होता. जगाला दर्जेदार कपडे निर्यात करणारा भारत आता आयात करणारा देश बनला होता. ज्या उद्योगात भारत जगाच्या 27 टक्के योगदान देत होता, तो 2 टक्क्यांच्या खाली आला. पहिल्या महायुद्धात भारतीय संसाधनांचा जबरदस्तीने वापर पहिल्या महायुद्धातील काही आकडेवारीवरून ब्रिटिशांनी भारतीयांचे किती शोषण केले हे समजू शकते. पहिल्या महायुद्धावेळी भारताला गरिबी आणि आर्थिक मंदीचा फटका बसला होता. असे असूनही या युद्धात भारताचा मोठा पैसा ब्रिटिशांनी वापरला. या युद्धात लढलेला ब्रिटिश सैन्यातील प्रत्येक सहावा सैनिक भारतीय होता. या युद्धात 54 हजारांहून अधिक भारतीय जवान शहीद झाले आणि सुमारे 70 हजार भारतीय जवान जखमी झाले. 

December 6, 2022

Pune: पुण्यात केशरची शेती फुललीय. ती देखील वारजेसारख्या या गजबजलेल्या भागात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य? हो हे शक्य आहे आणि या शेतीला ना पाण्याची गरज आहे, न मातीची गरज आहे, न सूर्यप्रकाशाची. कारण ही शेती होतेय ती फिरत्या चाकांवर असलेल्या या कंटेनरमध्ये. मागील सहा वर्ष कंटेनरमध्ये वेगवेगळी पिकं पिकवल्यानंतर शैलेश मोडक नावाच्या तरुणाने ही केशराची शेती यशस्वी करून दाखवलीय.  दहा वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यावर शैलेश मोडक यांनी जेव्हा लाखो रुपयांची नोकरी सोडून जेव्हा शेती करायच ठरवलं, तेव्हा साऱ्यांनीच त्यांना वेडात काढलं. पण या वेडातूनच ही न्यारी दुनिया फुलली आहे. एरवी फक्त इराण- तुर्कस्तान आणि काही प्रमाणात आपल्या काश्मीरमध्ये पिकणारं केशर त्यांनी इथ पिकवलं आहे. केशरचा कंद उगवून येण्यासाठी एरवी मातीत बी पेरावं लागतं. पण इथे फक्त हवेतील आर्द्रता नियंत्रित करून हे कंद वाढवण्यात आलेत. या कंदांना जेवढं तापमान लागतं ते इथ सेन्सरच्या साहाय्याने नियंत्रित करण्यात आलं आहे. केशरच्या पिकासाठी लागणारा हवेतील प्रत्येक घटक इथ पुरवण्यात आला आहे.  केशरच्या या कंटेनरमध्ये एक सेन्सर आहे. तसेच सूर्यप्रकाशाची गरज भरून काढण्यासाठी रंगबीरंगीत लाईट्स आहेत. यात कार्बनडायऑक्साईड पुरवणारे सिलेंडर देखील आहेत. हे सगळं कंट्रोल होत ते मोबाईलच्या एका क्लिकवर. केशराच्या या शेतीसाठी शैलेश मोडक यांनी काश्मीरमधील पाम्पोर इथं जाऊन तिथल्या शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आणि तिथून केशरचे कंद ते पुण्याला घेऊन आले.  पाम्पोरमध्ये जसं हवामान आहे, तसं हवामान त्यांनी या कंटेनेरमधे निर्माण केलं आहे. त्यासाठी ते दररोज पाम्पोर मधील हवामानात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवतात आणि त्यानुसार इथ तापमान आणि इतर गोष्टी नियंत्रित करतात.  2018 साली शैलेश यांनी मुंबईतील जे एन पी टी बंदरातून पाच लाख रुपयांना हा कंटेनर विकत घेतला आणि त्यामध्ये कंट्रोल फार्मिंग करायच ठरवलं. एरवी एक एकर शेतीमध्ये जेवढं पीक उगवलं असतं, ते या कंटेनरच्या आतमधील 320 स्क्वेअर फूट जागेमध्ये घेण्यात आला आहे. केशरच्या आधी या कंटेनरमधे शैलेश मोडक यांनी इतरही पिकं यशस्वीपणे घेऊन दाखवली आहे. शैलेश यांनी या कंटेनरमध्ये पिकवलेलंहे पाचवं पिक आहे. याआधी त्यांनी यात अंजीर, स्ट्रॉबेरी, विदेशी पालेभाज्या पिकवल्या आहेत. एरवी काही एकर जागा लागली असती या पिकांसाठी, ती या कंटेनरमध्ये बारच्या साहाय्याने निर्माण करण्यात आली आहे. यातील बार हे लाईट्सच्या दिशेने विशिष्ट पद्धतीने उभे करण्यात आलेत. हा कंटेनर ट्रकवर लादून कुठेही नेहता येतो आणि कुठेही पार्क करता येतो. कंटेनरमधील या शेतीचा नैसर्गिक हवामानाशी कोणताही संबंध नसल्याने वर्षाचे बाराही महिने या कंटेनरमधे हवं ते पीक काढता येतं. दरम्यान, पिढ्यानपिढ्या तोट्यात चालणाऱ्या शेतीला शैलेश मोडक यांनी स्टार्टअपचं रुप दिलं आहे.  मागील सहा वर्षांमधे हे स्टार्टअप यशस्वी ठरत आहे.

December 6, 2022

Purandar figs : अतिवृष्टीमुळे यंदा (Fig) सिताफळ, अंजिराच्या अनेक बागा नष्ट झाल्या, मात्र पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडे आणि निलेश झेंडे यांनी त्यांची अंजिराची बाग वाचवली. विशेष म्हणजे आता त्यांच्या अंजिराला सोन्याचा भावदेखील मिळत आहे. पुरंदर तालुका हा सीताफळ आणि अजिंरासाठी प्रसिद्ध आहे. मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजिराच्या बागा उध्वस्त झाल्या होत्या. पावसामुळे अंजिराच्या बागेवर करपा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडे आणि निलेश झेंडे यांनी बाग वाचवली. त्यांच्या अंजिराला योग्य भावही मिळत आहे आणि पंचक्रोशीत चर्चादेखील होत आहे.  जागतिक बाजारपेठेमध्ये पुरंदरच्या अंजिराला मिळालेले स्थान पाहता पुरंदरच्या अंजिर शेतकऱ्यांचे सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. पुरंदरमधील दिवे येथील शेतकरी दत्तात्रय झेंडे आणि निलेश झेंडे यांनी त्यांच्या एकूण 100 अंजिरांच्या झाडांमधून चांगले उत्पादन मिळत आहे. सध्या झेंडे यांची दीड एकरावर अंजिराची बाग आहे.  एक महिन्यापासून अंजिराच्या काढणीला सुरुवात झाली असून यातून  निव्वळ 7 लाख रुपये नफा मिळेल, असा शेतकरी अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शेती ते बाजार अंजिराचा प्रवास कसा होतो?दत्तातत्र्य  झेंडे यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतल आहे. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आंजिर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ निलेश झेंडे आणि कुटुंबातील सर्व सदस्य आंजिरच्या शेतात काम करतात. यातून चांगला नफा मिळत आहे. शेतीचं बऱ्यापैकी ज्ञान असल्याने औषध आणि  खते यांचं ते योग्य नियोजन करतात. अंजिराचे उत्पादन घेताना त्याचे पॅकेजिंगची सर्व जबाबदारी महिला सांभाळतात. पुरंदर या ब्रँडिंग खाली झेंडे यांची अंजीर थेट मुंबईच्या बाजारात पाठवले जातात. अंजिरला सोन्याचे दिवसपुरंदर तालुक्‍यातील दिवे, सोनोरी, वाघापूर, राजेवाडी, गुऱ्होळी तसेच इतर भागातही अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. अंजीर पिकाची काढणी सुरू आहे. सध्या बाजार भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक नफा मिळत आहे. अंजिराच्या एका पेटीमध्ये बारा फळे तर चार पेट्या मिळून एक बॉक्‍स तयार होतो. या चार बॉक्स मिळून एक जोठा तयार होतो. याची वर्गवारी ही 3 विभागात केली जाते. मोठी साईजला एका जोठ्यात 48 अंजीर 300 ते 350 रुपये,  छोटी साईज मध्ये 60 अंजीर 200 ते 220 रुपयाला विक्री होते तर उकल 48 अंजीर 180 पर्यत भाव मिळतो आहे. बाजारपेठांमध्ये पुरंदरच्या अंजिराला विशेष मागणी असल्याने जवळपास 300 ते 350 रुपये प्रति जोठा दर मिळतो. एका जोठ्यात 4 डझन अंजीर असतात, असं शेतकरी निलेश झेंडे सांगतात.  एकेकाळी दुष्काळी असलेला पुरंदर तालुका आता अंजीर आणि इतर फळबागांच्या जोरावर समृद्धीच्या मार्गावर चालला आहे. सध्या अंजिराला चांगला भाव मिळत असल्याने झेंडे कुटुंबतील लोक आनंदी आहेत. अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं मात्र या अतिवृष्टीवर मात करून झेंडे यांनी ही अंजिराची बाग वाचवली. 

December 6, 2022

Toyota Innova Hycross Hybrid: वाहन उत्पादक कंपनी इनोव्हा आपल्या वाहनांना वारंवार अपडेट्स करत नाही. यामध्ये नवीन इनोव्हा हायक्रॉस ही एक मोठी गोष्ट आहे. कंपनीसाठी ही एक महत्वाची कार आहे. कारण या एमपीव्हीसाठी हा मोठा बदल आहे. इनोव्हा क्रिस्टाच्या विपरीत, हायक्रॉस मोनोकोक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. आता यामध्ये पेट्रोल हायब्रीड पॉवरट्रेन देखील मिळतो. ही कार फक्त आपल्या जुन्या ग्राहकांनाच आवडणार की नवीन ग्राहकांनाही आकर्षित करणार? हे जाणून घेण्यासाठी आम्ही याची शॉर्ट ड्राइव्ह घेतली आहे.     लूक  नवीन इनोव्हा हायक्रॉस दिसायला मोठी असून ही दिसायला hSUV सारखी आहे. याला आता मोठ्या ग्रिलसह एक उपराईट लूक मिळतो. 4755 मिमी लांबीसह, नवीन इनोव्हा हायक्रॉस क्रिस्टापेक्षाही मोठी आहे. स्लिम एलईडी लाईट, लहान ओव्हरहॅंग्स आणि क्रॉसओवर सारख्या दिसणार्‍या रेक विंडो लाइनसह डिझाइन खूपच आकर्षक आहे. यासोबतच यात नवीन रंगांचा प्रीमियम टचही जोडण्यात आला आहे. याचे मोठे दरवाजे उघडताच आतमध्ये SUV सारखी ड्रायव्हिंग पोझिशन दिसून येते. टोयोटाने यामध्ये बरेच बदल केले आहेत. याच्या केबिनमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाने भरलेले फीचर्स दिसते. या हायब्रिडमधील सर्व माहितीसाठी तुम्हाला मध्यभागी मोठ्या टचस्क्रीनसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. सेंटर कन्सोलवर येत असताना त्याची पोझिशनिंग खूप चांगली आहे आणि यात टोयोटा कारमधील सर्वोत्तम टचस्क्रीन देखील मिळते. यामध्ये ग्राफिक्स, आयकॉन्स चांगले दिसतात. सॉफ्ट टच इन्सर्ट आणि लेदर अपहोल्स्ट्रीच्या बाबतीत क्रिस्टापेक्षा याच्या गुणवत्तेत बरीच सुधारणा झाली आहे. फीचर्स  नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये तुम्हाला एक मोठा डबल पेन पॅनोरामिक सनरूफ, एक प्रशस्त केबिन, कुल आणि पॉवर असलेली फ्रंट सीट, मल्टी झोन ​​क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, 9 स्पीकर JBL ऑडिओ सिस्टम, पॉवर्ड हँडब्रेक सारखे फीचर्स मिळतात. यात वायरलेस स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. इंजिन  यामध्ये 2.0 L पेट्रोल इंजिनशी जोडलेली इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी कम्बाईन 184 bhp पॉवर जनरेट करते. यात ECVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कमी वेगावर ही गाडी चालवताना याचे टॉर्क रिफाइनमेंट आणि स्मुथनेस उत्तम आहे. गाडी वेगाने चालवताना इंजिन थोडं आवाज करतं. चांगल्या ग्राउंड क्लीयरन्समुळे कार खूप स्मूथ वाटते. मायलेज  इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड पूर्ण टाकीसह 1000 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. या कारचे मायलेज 21 kmpl पेक्षा जास्त, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर आम्हाला ड्राइव्ह दरम्यान 18 kmpl च्या जवळपास मायलेज मिळाला. जे तिच्या आकाराचा विचार करता खूप चांगलं आहे. प्रीमियम लूक, फीचर्स आणि स्मूथ हायब्रिड पॉवरट्रेनसह 20-30 लाखांच्या किमतीत यात बरेच काही देण्यात आले आहे. दरम्यान, आम्हाला या कारचा रंग, डिझाइन, कंफर्ट, इंजिन रिफाइनमेंट , फीचर्स आणि मायलेज खूप आवडलं. मात्र तरीही यात डिझेल इंजिनची पॉवर आणि टॉर्कचा अभाव आहे.  

December 6, 2022

Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले! तुम्हाला मिळू शकते एन्ट्री, असं करा घरबसल्या बुकिंगराष्ट्रपती भवनाचे (Rashtrapati Bhavan) दरवाजे सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही काय पाहू शकता? तसेच राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्यासाठी कशा प्रकारे बुकिंग करावे लागते? याबाबत जाणून घेऊयात... Read MoreABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचाCheck Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read MoreKannada Rakshana Vedike: बेळगावात उच्छाद मांडणारी \'कन्नड रक्षण वेदिके\' संघटना आहे तरी काय?Kannada Rakshana Vedike: बेळगावात मराठी भाषेविरोधात आणि मराठी एकीकरण समितीविरोधात आक्रमक होणारी कन्नड रक्षण वेदिके ही संघटना नेमकी आहे तरी काय? Read MoreLive In Relationship New Law: लग्नापूर्वी शारीरिक संबंधांवर \'या\' देशात बंदी, लिव्ह इन रिलेशनशिप ठरणार गुन्हाIndonesia New Law : इंडोनेशियातील LGBTQ समुदायावर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो, जेथे समलैंगिक विवाहाला परवानगी नाही. Read MoreMovies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शितMovies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read MoreHansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरलHansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read MoreNick Bollettieri : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासTennis News : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा अशा दिग्गज टेनिसपटूंचे गुरु कोच निक बोलेटिएरी याचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. Read MorePele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअरFootballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे. Read MoreLawyers Black Coat: वकील काळा कोट का घालतात? यामागचा इतिहास आहे खूपच रंजक! जाणून घ्या Lawyers Black Coat: केवळ भारतातच नाही तर जगभरातील वकील काळा कोट घालून न्यायालयात येतात. यामागे काय कारण आहे? जाणून घ्या Read MoreCement Price: घराच्या किंमती वाढणार; सिमेंटच्या दरात होणार \'इतकी\' वाढCement Price: सिमेंट कंपन्यांकडून सिमेंटच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात वाढ होणार आहे. याच्या परिणामी घर खरेदी, घर बांधणी महागणार आहे. Read More

December 6, 2022

Nashik News Update : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाया सुरू आहेत. कळवण शहरात रेशन धान्याची खुल्या बाजारात होणाऱ्या विक्रीचा पोलिसांनी आज भांडोफोड केलाय. कळवणमध्ये एका गोडावूनवर छापा टाकत 24 लाख रुपयांचा गहू ( wheat ) आणि तांदूळ  ( Rice) जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी संशयितांस ताब्यात घेण्यात घेतलं आहे.   गेल्या काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायाविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून दररोज जिल्ह्यात कारवाया करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आदेशीत केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक स्वरूपावर कारवाई करण्यात येत आहे.   कळवण पोलिस ठाणे हद्दीत कळवण शहरातील कळवण ते देवळा रोडवर प्रभात स्टीलचे बाजुला असलेल्या गोडावुनमध्ये शासनाने गोरगरीब जनतेला रेशनवर उपलब्ध करून दिलेल्या तांदळाचा साठा खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवलेला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिस पथकाने कळवण शहरात कळवण ते देवळा रोडवर प्रभात स्टीलच्या शेजारी उत्तराभिमुखी असलेल्या जोगेश्वरी या गोडावूनवर छापा टाकला.  या कारवाईत 24 लाख रुपयांचा गहू आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या संशयित अजय मधुकर मालपुरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  शासनाने गोरगरीब जनतेस अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 5 लाख 82 हजार रुपये किंमतीचा 19.40 टन तांदुळ, 3 लाख 80 रुपयांचा 15.20 टन गहू व घटनास्थळी मिळालेली वाहने असा एकूण 24 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीममागील दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पथकांद्वारे कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, गुटखा, अवैध शस्रे बाळगणारे, हॉटेल धाबे कारवाई, गांजा बाळगणे आदी कारवाया केल्या आहेत. या सर्व प्रकरणात 749 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर 87 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  महत्वाच्या बातम्या Nashik Airport : अखेर पंधरा दिवसांनंतर नाशिक विमानतळ सुरु, नाशिक-दिल्ली-हैदराबाद पूर्ववत  

December 6, 2022

School Leaving Certificate : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.  शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद असून अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतूद आहे. त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय / महानगरपालिका / नगरपालिका / खाजगी अनुदानित / कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये, याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी/ मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरूद्ध/ मुख्याध्यापकाविरूद्ध नियमानुसार/ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. या शासन निर्णयाप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल. यानंतर जुनी शाळा सात दिवसाच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. कोविडच्या प्रादूर्भावानंतर काही कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) (Transfer Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित शाळेत या दाखल्याअभावी प्रवेश देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने अशा विद्यार्थ्यांना सुलभरितीने प्रवेश मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

RSS Error: A feed could not be found at `https://maharashtratimes.com/rss.cms`; the status code is `200` and content-type is `text/html;charset=utf-8`